जिल्हापरिषद निवडणूक लांबणीवर गेल्यामुळे माजी लोकप्रतिनिधी अदृश्य ग्रामीणमधला मतदार लोकप्रतिनिधीना रखडलेला विकासाचा जाब का विचारत नाही?धम्मराज नवले.
जिल्हापरिषद निवडणूक लांबणीवर गेल्यामुळे माजी लोकप्रतिनिधी अदृश्य ग्रामीणमधला मतदार लोकप्रतिनिधीना रखडलेला विकासाचा जाब का विचारत नाही?धम्मराज नवले. आपण सातत्याने दर पाच वर्षाने मतदान करतो. लोकप्रतिनिधी म्हणुन निवडून देतो मात्र निवडून दिलेल्या प्रतिनिधीला आपण कधीच प्रश्न विचारत नाही आपल्या मागण्या करत नाही व्यक्ती स्तरावर पण नाही आणि गाव हितासाठी सुद्धा नाही. कारण तो फक्त निवडणूक पुरता आपला असतो,आपल्याला मोठे स्वप्न दाखवतो मात्र वास्तविक ते शून्य असते. आज जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर गेल्यात अद्याप निवडणूकचा ठाव ठिकाणानाही आणि आता निवडून आलेले पाच वर्षे भोगलेले प्रतिनिधी अदृश्य झालेत. कित्येक लोकप्रतिनिधीला सामान्य जनता ओळखत नाही. कारण ते कधीच जमीन स्तरावर काम केलेले नाही व बऱ्यापैकी फक्त पैश्यामुळे अथवा घराणेशाही मुळे निवडून आलेत. आता तर त्यांना त्यांच्या परिवारातील पिढी पुढे न्यावी लागणार आहे मग साधारण मेहनती कार्यकर्ता फक्त सतरंज्या उचलण्यासाठी. चांदुर बाजार मधील जिल्हा परिषद कुऱ्हा येथे विकास कामे काय आणि सभासद कोण हे तर किती तरी लांब असलेलं प्रश्न आहे. सामान...