जिल्हापरिषद निवडणूक लांबणीवर गेल्यामुळे माजी लोकप्रतिनिधी अदृश्य ग्रामीणमधला मतदार लोकप्रतिनिधीना रखडलेला विकासाचा जाब का विचारत नाही?धम्मराज नवले.
जिल्हापरिषद निवडणूक लांबणीवर गेल्यामुळे माजी लोकप्रतिनिधी अदृश्य ग्रामीणमधला मतदार लोकप्रतिनिधीना रखडलेला विकासाचा जाब का विचारत नाही?धम्मराज नवले.
आपण सातत्याने दर पाच वर्षाने मतदान करतो. लोकप्रतिनिधी म्हणुन निवडून देतो मात्र निवडून दिलेल्या प्रतिनिधीला आपण कधीच प्रश्न विचारत नाही आपल्या मागण्या करत नाही व्यक्ती स्तरावर पण नाही आणि गाव हितासाठी सुद्धा नाही.
कारण तो फक्त निवडणूक पुरता आपला असतो,आपल्याला मोठे स्वप्न दाखवतो मात्र वास्तविक ते शून्य असते.
आज जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर गेल्यात अद्याप निवडणूकचा ठाव ठिकाणानाही आणि आता निवडून आलेले पाच वर्षे भोगलेले प्रतिनिधी अदृश्य झालेत. कित्येक लोकप्रतिनिधीला सामान्य जनता ओळखत नाही. कारण ते कधीच जमीन स्तरावर काम केलेले नाही व बऱ्यापैकी फक्त पैश्यामुळे अथवा घराणेशाही मुळे निवडून आलेत. आता तर त्यांना त्यांच्या परिवारातील पिढी पुढे न्यावी लागणार आहे मग साधारण मेहनती कार्यकर्ता फक्त सतरंज्या उचलण्यासाठी.
चांदुर बाजार मधील जिल्हा परिषद कुऱ्हा येथे विकास कामे काय आणि सभासद कोण हे तर किती तरी लांब असलेलं प्रश्न आहे. सामान्य ग्रामीण भागातील जनतेला अद्यापही आपले जिल्हा परिषद सदस्य कोण होते हे पण माहिती नाही मग काय सामान्य लोकांच्या हिताचे लोकप्रतिनिधी.
धम्मराज नवले यांनी सातत्याने ग्रामीण भागात युवकांच्या हितासाठी कार्य केले आहे व करीत आहेत.
ग्रामीण भागातील खंडित असलेल्या बस सेवा विद्यार्थ्यांना सुरू करून दिल्यात.
तळेगाव मोहना ते कोंडवर्धा मार्ग करजगाव अतिशय वाईट परिस्थिती असलेला मार्ग त्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग कडून सातत्याने निवेदन देऊन मागणी करून काम पूर्ण करून घेतले. तळेगाव मोहना ते गुणवंत बाबा तीर्थक्षेत्र असलेलं मार्ग अतिशय जीव घेणा होता मात्र सातत्याने बांधकाम विभाग मागणी करून तो मार्गी लावला. ग्रामीण स्तरावरील शहरी भागात रुग्णांना रुग्णालयात सुविधा उपलब्ध करुण देने. आदिवासी
गरोदर महिलांना रुग्णवाहिका विनामूल्य घरपोच सेवा. मेळघाट दुर्गम भागातील आदिवासी महिलांना रक्त उपलब्ध करून देणे. तळेगाव मोहना अपघात वळण असलेल्या मार्गावर बचाव गार्ड व दक्षता फलक लावणे आदी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न वसतिगृहाचे प्रश्न निकाली लावलेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोरोना काळात महाविद्यालयात प्रवेश फी माफ करण्या पासून तर आता पर्यंत कुठल्याही प्रकारचा विद्यार्थी शिक्षणापासून परिस्थिती मुळे वंचित राहता कामा नये यासाठी सामाजिक संस्था कडून नियोजन करीत आहेत.
आज राजकारण मध्ये सुशिक्षित युवा चेहऱ्याची गरज ज्याला खरोखर सामान्य जनतेच्या परिस्थिती जाण आहे किंबहुना त्याने उपयोजन करून जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणे गरजेचे आहे. ग्रामीण क्षेत्रात रोजगार उपलब्ध करण्यासाठी युवकांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे व उपलब्ध करणे महत्वपूर्ण ठरते.
Comments
Post a Comment